गुजरात विधानसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसच्या तिघांचे अर्ज!

बडोदा | गुजरात विधानसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसच्या चक्क तीन उमेदवारांनी अर्ज भरलेत. मात्र तरीही काँग्रेससाठी हा डोकेदुखीचा विषय नसल्याचं कळतंय.

काँग्रेसनं अद्याप तिघांपैकी एकालाही अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली नाही. मात्र आम्ही एकी दाखवण्यासाठी अर्ज भरलेत. तिकिटांची घोषणा झाली की इतर दोघे उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देतील, असं या तिन्ही दावेदारांचं म्हणणं आहे. 

खुमाणसिंह चौहाण, सागर ब्रम्हपभट और विजय गोहिल अशी या तिघांची नावं आहेत. सावली मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केलीय. या प्रकाराची गुजरातमध्ये चांगलीच चर्चा आहे.