बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकाच दिवसात तीन पदकं! थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारला कांस्यपदक

टोकियो | सध्या टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक राहिला आहे. आज भारताने एक दोन नव्हे तर तीन पदकं आपल्या नावावर केली आहे. भारताच्या विनोद कुमारने कांस्यपदक पटकावत भारताला टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलं आहे.

विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून खेळत असताना 19.91 मीटर लांब थाळी फेकली आणि कांस्यपदक नावावर केलं. विनोद कुमारने सहा प्रयत्नांमध्ये हे यश मिळवलं आहे. पहिल्या प्रयत्नात त्याने 17.46 मीटर दूर थाळी फेकली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 18.32 मीटर थाळी फेकली. मात्र लक्ष आणखी दूर होतं.

पहिल्या दोन डावात अपेक्षेप्रमाणे विनोद कुमारला यश मिळालं नाही. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 17.80 मीटर थाळी फेकली. त्यानंतर 19.20 मीटर केला. मात्र विनोद पदकापासून दूर होता. त्यानंतर पाचव्या प्रयत्नात विनोदने आणखी जोर लावत 19.91 मीटर लांब थाळी फेकली. त्यावेळी भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या. आता सहाव्या फेरीत काय होणार याची चिंता होती.

दरम्यान, सहाव्या फेरीत इतर कोणतेही खेळाडू 19.91 मीटरपेक्षा जास्त लांब थाळी फेकू शकले नाही. विनोदने 19.81 मीटर थ्रो केला आणि विनोदचं कांस्यपद निश्चित झालं. आजच्या दिवसात भारताला तीन पदकं मिळाली आहेत. उंच उडी स्पर्धेमध्ये भारताच्या निशाद कुमार याला रौप्यपदक मिळालं. तर सकाळी भारतीय टेबल टेनिसपटू भाविना पटेलने महिला एकेरीत रौप्यपदक पटकावलं आहे.

थोडक्यात बातम्या-

निशादची ऐतिहासिक कामगिरी; उंंच उडीत पटकावलं सिल्वर मेडल

अमेरिकेची चिंता वाढली; लष्करी साठ्यावर आता तालिबानचा कब्जा

“भाजप मनसे युती होणं अशक्य, भाजपला मनसेची काय गरज?”

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू; देशभरात संतापाची लाट

राज्यातील शाळा सुरू होणार?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More