बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! गोव्यात काॅंग्रेसचा भाजप आणि टीएमसीला जोर का झटका

नवी दिल्ली | आगामी काळात देशात विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections) होणार आहेत. परिणामी प्रत्येक पक्षानं (Every Party) आपापली तयारी चालू केली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील गोवा (Goa Elections) राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. यंदा प्रथमच गोव्यात टीएमसी (TMC) आपली ताकद आजमावत आहे. अशातच आता काॅंग्रेसनं (Congress) मोठी खेळी केल्याची बातमी समोर येतं आहे.

गतकाही दिवसांपासून गोव्यात टीएमसी (TMC) आणि भाजपकडून (BJP) काॅंग्रेसवर जोरदार राजकीय टीका होत होती. इतकंच नाही तर काँग्रेसला गोव्यात मोठं खिंडार पाडण्याची तयारी टीएमसी आणि भाजप दोन्हीकडून करण्यात येत होती. गत निवडणुकीत सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ येऊनही काॅंग्रेसला अंंतर्गत कलहामुळं सत्ता स्थापन करता आली नव्हती.

गोव्यात काॅंग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत असताना काॅंग्रेसनं सर्वांना धक्का दिला आहे. गोवा फाॅरवर्ड पक्षाच्या दोन आणि एका अपक्ष आमदारांनी नवी दिल्लीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काॅंग्रेस खासदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या तीन आमदारांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पाळेकर आणि अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात सरदेसाई यांना टीएमसी प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ममता यांच्या पक्षात जाण्याऐवजी काॅंग्रेसमध्ये जाणं पसंत केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“आधी आमच्या शेतातील वीज खांबाचं भाडं द्या अन् नंतरच वीज कनेक्शन कापा”

“शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत, ते भाजप सोडून गेले नाहीत”

चुकीला माफी नाही! KL Rahul आणि Rashid Khan यांंच्यावर 1 वर्ष बंदीची शक्यता

गृहिणींसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता

‘Omicron’ फक्त नावाचा खेळ! मिळाला 900 टक्क्यांचा रिटर्न्स; वाचा नेमका प्रकार काय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More