बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

मुंबई | आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याच अडचणींमध्ये वाढ पहायला मिळत आहे. समीर वानखेडेंवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक तर दररोज आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता वानखेडेंच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता क्रांती रेडकर यांनी आपले कुटुंब सुरुक्षित नसल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली असून, आम्ही पोलिसांना त्याचे सीसीटीव्ही फुटेजही देऊ, असं क्रांती रेडकरनं म्हटलं आहे.

क्रांती रेडकरनं यावेळी आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. माझ्या घरी माझी मुले असतात. ती लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे, असं म्हणत क्रांती रेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेच्या कुटुंबियांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती. यानंतर आता समीर वानखेडे यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी आणखी काय घडामोडी पहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सर, बेइज्जती केली जातेय…’, अन् समीर वानखेडे वैतागून भडकले

पाकला बरबाद करणं आमचं पहिलं लक्ष्य; ‘या’ कारणांमुळे इसिस खुरासान गटाने दिला इशारा

“चेंबुरमधील ‘तो’ व्यक्ती आमचा मित्र नाही तर कार्यकर्ता”

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

‘मरेल पण भाजप सोबत जाणार नाही’; प्रियंका गांधींचं भाजपवर शरसंधान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More