बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला मोठा धक्का! तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे आणि वरिष्ठ नेतेमंडळीकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे शिवसेनेचे तीन वेळा आमदार आणि राज्यमंत्री राहिलेले अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते भाई जगताप आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मागील काही दिवसापासूून शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे शिंदे नाराज होते. तसेच शिवसेनेतील वरिष्ठ नेतेमंडळीही योग्य ती दखल घेत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे शिदेंना शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पंजा हाती धरला आहे. याबाबत नाना पटोलेंनी ट्विट करत माहिती दिली आहे.

अलिकडेच महाविकास आघाडीत करूबुरी होत असताना शिंदेच्या प्रवेशामुळे काँग्रसने शिवसेनेला धक्का दिला आहे. अशोक शिंदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत नाना पटोेलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असलेल्या वक्तव्यामुळे पटोले अडचणीत सापडले होते. या आरोपांमुळे अनेक महत्वाच्या नेत्यांनी पटोले यांच्यावर नाराजी दर्शवली होती आणि आता शिंदेंनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/1422490249180041218

थोडक्यात बातम्या-

अभिमान बाळगण्यापेक्षा सिंधूची जात शोधण्यात भारतीय व्यस्त; ‘हे’ राज्य आघाडीवर!

दिलासादायक! मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“राज्यपालांच्या दौऱ्यावर बोलण्यापेक्षा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याचा आढावा घ्या”

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More