बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंडोममध्ये सोनं घालून अशा जागी लपवलं, मुंबई एअरपोर्टवर पोलीसही हैराण!

मुंबई | मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची जास्त गर्दी असते. त्यामुळे  विमानतळावर पोलीस सुरक्षाही तितकीच कडक ठेवली जाते. परंतु अलिकडेच तीन महिलांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्या महिलांचा पराक्रम पाहून अधिकारीही काही वेळ हैराण झाले होते.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार मोहमुद खुरेशा अली (वय 61), अब्दुल्लाही अब्दिया अदान (वय 43) आणि अली सादिया अल्लो (वय 43) या महिला पँटमध्ये ड्रग्ज लपवुन आणत आणल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. परंतु तपासणी नंतर त्या महिलांकडे ड्रग्जऐवजी सोनं सापडलं. या महिलांनी ज्या प्रकारे सोन्याची तस्करी केली ते पाहून तपासणी करत असलेले अधिकारीही आश्चर्यचकित झाले.

या महिला केनिया देशातील असून त्या केनियातुन कतारला गेल्या. त्यानंतर त्या दोहा येथुन मुंबईत उतरल्या. या महिलांनी कंडोममध्ये सोनं भरून ते सोनं प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं. त्यानंतर मुंबई विमानतळावर एनसीबीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान त्यांच्याजवळ  तब्बल 937.78 ग्रॅम सोनं सापडून आलं आणि जप्त केलेल्या 13 पॅकेटमधील 17 सोन्याचे भाग आढळून आले. त्यांची किमंत अंदाजे 50 लाखांपेक्षा अधिक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सोनं तस्करी करणाऱ्या या महिलांना विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यानंतर एनसीबीने त्या महिलांना कस्टम्सकडे सोपवलं. त्यांची चौकशी करत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांना सर जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांना वैद्यकीय निगराणीखाली रूग्णालयातच ठेवण्यात आलं असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

टिश्यू पेपरची किंमत चक्क कोटींमध्ये; तब्बल ‘इतक्या’ कोटीला विकला गेला ‘तो’ खास टिश्यू पेपर

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

भाजपविरूद्ध सोनिया गांधींचा मोठा प्लॅन; ‘या’ खास नेत्यांना दिलं निमंत्रण!

“आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच”

“देशमुखांच्या 100 कोटीत शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हिस्स्याची चौकशी झाली पाहिजे”

 

 

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More