बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

LIC च्या ‘या’ स्कीमद्वारे मुलीचं भवितव्य होईल सुरक्षित, लग्नाच्या वेळी मिळतील 22 लाख

नवी दिल्ली | प्रत्येक पालकांना आपल्या मुलींची त्यांच्या उज्वल भविष्याची चिंता लागून असते. त्यामुळे आपण एक उत्तम गुंतवणूक (Investment) करत असतो. त्यामुळे एक उत्तम गुंतवणूक ही नेहमीच चांगला फायदा करुन देत असते. अशातच आता मुलींच्या भविष्यासाठी जास्त चिंता करेपर्यंत तुम्ही हळूहळू त्यांच्यासाठी गुंतवणूक करु शकता, अशी योजना ‘एलआयसी’ कंपनीनं आणली आहे.

एलआयसीच्या(LIC) नवीन योजनेद्वारे पालक आपल्या मुलींसाठी त्यांच्या लग्नासाठी एक उत्तम गुंतवणूक करु शकतात. याशिवाय याचा परतावाही चांगलाच मिळणार. ज्याचा उपयोग मुलींच्या लग्नासाठी करु शकता. या खास पाॅलिसीचं नाव आहे ‘कन्यादान पाॅलिसी’.

कन्यादान पाॅलिसीच्या (Kanyadan Policy) अंतर्गत तुम्हाला रोज 150 रुपये जमा करावे लागणार आणि जेव्हा तुमची मुलगी मोठी होईल लग्नाला येईल यावेळी तुम्हाला एकूण 22 लाख रुपये मिळणार. जर या पाॅलिसीच्या अंतर्गत काही कारणास्तव मुलीच्या आई-वडिलांचं निधन झालं तर कुटुंबाला तात्काळ 10 लाख रुपये मिळणार.

दरम्यान, या पाॅलिसी अंतर्गत प्रत्येक वर्षी तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या काही खर्चांसाठी 1 लाख रुपये मिळणार. या पाॅलिसीविषयी अधिक माहिती एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला मिळेल.

थोडक्यात बातम्या –

तळीरामांना आता दारुवर मिळणार मोठी सूट, फक्त एवढीच आहे अट

नाना पटोलेंना मोठी लॉटरी?, ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

‘या’ भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, शेतीचंही मोठं नुकसान

पुण्यात मोठी खळबळ, आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर मोठा हल्ला

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More