बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींनी सहकाराला जगवण्याचं काम केलं- देवेंद्र फडणवीस

अहमदनगर | देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. प्रवरानगर येथील पहिल्या सहकार परिषदेला त्यानी संबोधित केलं आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती केली आहे.

सहकार चळवळ मोडित निघाले म्हणणारेच आता सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर फडणवीस यांनी नाव न घेता टीका केली आहे. सर्वांना माहिती आहे सहकारी साखर कारखाने नेत्यांच्या घशात घातले गेले आहेत, अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहकाराला जगवण्याचं काम केलं आहे. सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा विकास होणार आहे, या शब्दात फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे. फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. इथेनाॅल निर्मिती, एफआरपी या मुद्द्याला फडणवीस यांनी हात घातला होता.

दरम्यान, महाराष्ट्राला सहकारचा समृद्ध वारसा लाभला आहे. परिणामी अमित शहांच्या माध्यमातून राज्यातील सहकार क्षेत्रात बदल करण्याचा मानस यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे.

थोडक्यात  बातम्या 

कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध पेटलं; पिल्लाला मारल्यानंतर ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं

सहकार चळवळ मागे का पडली?, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?- अमित शहा

“अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, त्यांना तर…”

‘शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत अनिल परब की उद्धव ठाकरे?’; रामदास कदम आक्रमक

“लग्नाला उशीर केल्यास मुली पाॅर्न पाहत बसतील, त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More