Top News देश

गुदगुल्या करणं जीवावर बेतलं; दोन मित्रांच्या मृत्यूनं खळबळ

नवी दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीमध्ये एकमेकांना गुदगुल्या करताना तोल गेल्यानं छतावरुन पडून दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ते दोघं विकास दुआ नावाच्या बिजनेसमनच्या रेडीमेड कपड्यांच्या कारखान्यात कामाला होते. रविवारी 24 जानेवारी रोजी दुपारी फॅक्टरीच्या छतावर जेवण करायला गेले. जेवताना ते थट्टा-मस्करी करत होते पण थोड्यावेळानं त्यांनी एकमेकांना गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि तोल जाऊन ते छतावरुन खाली पडले. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही.

शफिक आणि शकिल अशी दोघा मृतांची नावं असून दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत शफिक दिल्लीच्या जाफराबाद परिसरात राहत होता. तर, शकिलचं घरही त्याच परिसरात होतं.

दरम्यान, कारखान्याच्या छतावर फक्त पायऱ्यांसाठी दरवाजा असून छताला कोणतीही सुरक्षा भिंत नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पुढील तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाही जर कोरोना वाढला तर…’; शरद पवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराची उडाली त्रेधातिरपीट!

‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र

“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”

ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हतं पाहिजे- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या