Kalawa l हिंदू धार्मिक कार्यांमध्ये कलावा (हातावर बांधायचा दोरा) एक महत्त्वाची वस्तू मानली जाते. हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यापूर्वी कलावा बांधला जातो. कलाव्याला मौली आणि रक्षासूत्र असेही म्हणतात. हिंदू मान्यतांनुसार, जो कोणी हातावर कलावा बांधतो त्याला ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा आशीर्वाद मिळतो. कलावा बांधल्याने देवांचा आशीर्वाद तर मिळतोच, शिवाय ग्रह-नक्षत्रांचा प्रतिकूल परिणामही कमी होतो.
नकारात्मकता दूर होते :
कलावा हाताच्या मनगटावर बांधला जातो. कलावा बांधल्याने नकारात्मकता दूर होते, तसेच आरोग्य चांगले राहते. हातासोबतच घरात अशा काही जागा आहेत, जिथे कलावा बांधणे शुभ मानले जाते. यामुळे घर-कुटुंब आणि करिअरसह जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया घरात कोणत्या ठिकाणी कलावा बांधावा.
Kalawa l स्वयंपाकघरात येथे बांधा :
स्वयंपाकघरातील खिडकीवर, पाण्याच्या भांड्यावर किंवा फ्रीजच्या हँडलवर कलावा बांधावा. स्वयंपाकघरात या ठिकाणी कलावा बांधल्याने अन्नपूर्णा देवीची कृपा प्राप्त होते, तसेच घरात अन्न आणि धनाचा साठा कायम राहतो. मात्र, धार्मिक कार्यात वापरलेला कलावाच बांधावा.
तिजोरीमध्ये ;
घरात धनाचे स्थान तिजोरीला मानले जाते. तिजोरीमध्ये कलावा बांधल्याने शुभ परिणाम दिसून येतात. तिजोरीमध्ये कलावा बांधल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. लक्ष्मीपूजनामध्ये वापरलेला कलावा तिजोरीला बांधावा, ज्यामुळे त्याचा अधिक लाभ मिळतो. मात्र, घराच्या तिजोरीला बांधलेल्या कलाव्याचा प्रभाव तेव्हाच दिसून येतो जेव्हा ती दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवली असेल आणि उत्तर-पूर्व दिशेला उघडत असेल.
तुळशीमध्ये :
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. तुळशीला कलावा बांधणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक परिणाम दिसून येतात, तसेच करिअरशी संबंधित समस्या दूर होतात.
मंदिरात कलावा बांधणे :
घराच्या मंदिरात कलावा अवश्य बांधावा. मंदिराच्या शिखरावर किंवा मूर्तीला कलावा बांधावा. असे केल्याने कुटुंबातील अडचणी दूर होतात, तसेच देवाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो.
टीप: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे.