तंत्रज्ञान देश

टिक टॉकची जादू… ३ वर्षापूर्वी घर सोडून गेलेला नवरा बायकोला परत मिळाला!

चेन्नई | टिक टॉकच्या माध्यमातून तमिळनाडूमधील एका महिलेने तीन वर्षापुर्वी हरवलेल्या पतीचा शोध लावला आहे. टिक टॉक अ‌ॅपमुळे पतीचा शोध लागल्यामुळे सर्वजण या अ‌ॅपचं कौतुक करत आहेत.

महिलेचा पती तीन वर्षापूर्वी भांडण झाल्यामुळे घर सोडून गेला होता. पती घर सोडून गेल्यामुळे पत्नी जयाने सर्वत्र शोध घेत पोलीस स्टेशनमध्येही पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण कुठेही तिचा पती सापडत नव्हता.

काही दिवसांपूर्वी जयाच्या एका नातेवाईकांने टिकटॉक वरील एका व्हिडीओमध्ये सुरेशला एका तृतीयपंथी महिलेसोबत पाहिलं.

नातेवाईकांनी व्हिडीओ दाखवल्यानंतर जयाने या व्हिडीओबद्दल सर्वत्र चौकशी केली. यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देत पोलिसांनी इतर तृतीयपंथीयांच्या मदतीने सुरेशला शोधून काढले.

महत्वाच्या बातम्या-

-“अनेकदा लढाईत मी एकटा पडलो पण लढत राहिलो याचा अभिमान”

-ट्वीटरवरून राहुल गांधींनी दिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा; पुढच्या अध्यक्षपदाच्या नावाचा पेच कायम

-वंचितने दिली काँग्रेसला ऑफर; विधानसभेसाठी आम्ही ‘इतक्या’ जागा सोडू

-६ भाषांसाठी अभिमानाची गोष्ट; मराठीचाही समावेश!

-…म्हणून शमीची कामगिरी चांगली; पाकिस्तानी खेळाडूने तोडले अकलेचे तारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या