तंत्रज्ञान

‘टिकटॉक प्रो’फेक लिंकपासून सावध रहा!, शासनाचं आवाहन

टिकटॉकवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक फेक टीकटॉक प्रो लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.

सध्याच्या काळात भारत सरकारने टिकटॉक सहित अन्य ५८ ॲपवर बंदी घातली आहे. परंतु चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी समाजकंटकांकडून उपरोक्त फेक लिंक बनवली असून त्याचा प्रसार व्हाट्सॲप मेसेजेस व एसएमएसवर केला जातो. तुमची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते. त्या मेसेजचा एक प्रकार खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, तुम्ही अशा कोणत्याही मेसेजच्या लिंक वर क्लिक करु नये. तसेच हे लक्षात ठेवा की, अशा लिंक्समध्ये मलवार असू शकतो. त्यामुळे यापासून सावध असावे.

तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

औरंगाबादेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!

सुशांतसिंगच्या ‘दिल बेचारा’ सिनेमाच्या ट्रेलरचा करिश्मा; केला ‘हा’ जबरदस्त विक्रम

महत्वाच्या बातम्या-

कोरोना उपचार सुविधांसाठी महाराष्ट्राने ठेवला देशासमोर आदर्श

आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी झाल्यानंतर अशोक चव्हाण म्हणतात…

कोरोनातून सावरल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मैदानात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या