Top News तंत्रज्ञान

भारताचा दणका; टिकटाॅकला इतक्या हजार कोटी रुपयांचा फटका!

नवी दिल्ली |  भारत चीन सीमावादाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या 59 अ‌ॅपवर बंदी आणली आहे. त्यामध्ये लोकप्रिय टिकटॉक अ‌ॅपवर देखील बंदी आली आहे. यामुळे टिकटॉकचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे.

एका अहवालानुसार, एका वर्षाला 6 अब्ज अमेरिकन डॉलर इतका तोटा टिकटॉकला होऊ शकतो. युनिकॉर्न बाईटडान्स या कंपनीने टिकटॉक आणि आणखी दोन अ‌ॅपवरच्या बंदीमुळे कंपनीला 6 अब्ज अमेरिकन डॉलर इतका मोठा फटका बसणार आहे.

जगाच्या तुलनेत 30 टक्के भारतीय लोक टिकटॉकचा वापर करायचे. भारतात हे अ‌ॅप खूपच लोकप्रिय होतं. कित्येक कोटी लोक हे अ‌ॅप वापरायचे. अनेक जण यावर व्हीडिओ बनवून पैसे देखील कमवायचे. मात्र रातोरात टिकटॉक बंद झाल्याने त्यांचा उत्पन्नाचा मार्ग देखील आता बंद झाला आहे.

दुसरीकडे टिकटॉकबरोबरच व्हिगो व्हीडिओ आणि हॅलो या अ‌ॅपवरदेखील बंदी आणली गेली आहे. याशिवाय वुईचॅट आणि पाच मॅसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या अ‌ॅपवर देखील बंदी आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार- उद्धव ठाकरे

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा

सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करतायत- चंद्रकांत पाटील

“मंंत्र्यांच्या गाडीसाठी त्वरित जीआर निघतो, आम्हा शिक्षकांच्या पगाराला नियम फार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या