देश

टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

नवी दिल्ली | सरकारनं सांगितलेल्या नियमांचं पालन करत टिकटॉक सुरू आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही युजरची माहिती कुणालाही पुरवलेली नाही अगदी चीनच्या सरकारला सुद्धा नाही, अशी प्रतिक्रिया टिकटाॅककडून देण्यात आली आहे. यासोबत कंपनीनं आपल्या माध्यमांच समर्थन करताना अनेक युक्तिवादही मांडले आहेत.

देशातील 14 भाषांमध्ये टिकटॉक उपलब्ध करून देऊन आम्ही इंटरनेटचं लोकशाहीकरण केलं आहे. टिकटॉकचा वापर लाखो लोकांकडून केला जात आहे. टिकटाॅक हे अनेकांच्या रोजगाराचं साधन आहे, असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी म्हटलं आहे.

सरकारकडून माहिती आल्यावर नियुक्त केलेल्या अधिकार्याला भेटून यासंबंधी स्पष्टीकरण देऊ. आमच्यासाठी युजर्सची प्रायव्हसी जपणे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे, असंही टिकटाॅककडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आयटी अॅक्टच्या सेक्शन ६९ ए अंतर्गत टिकटाॅक, यु सी ब्राउजर सह ५९ अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नुकतीच यासंबधी माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

‘भाजपमध्ये गेलो असलो तरी…’; ‘या’ भाजप नेत्याने पवारांची बाजू घेत पडळकरांना झापलं

‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेची अमित शहांवर टीका, म्हणाले…

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या