Top News पुणे मनोरंजन महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या

Photo Credit- Instagram/ Sameer Gaikwad

मुंबई | पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाडने आत्महत्या केली आहे. 22 वर्षीय समीरने रविवारी आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी बांधत गळफास घेतला आहे.

समीर गायकवाड हा त्याच्या हटके स्टाईलमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. टिकटॉकवरील त्याचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

समीर गायकवाडने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे समीरच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

समीरने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

थोडक्यात बातम्या-

“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”

‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा

येत्या काळात भाजप ‘आरक्षण’ बाजूला काढेल- जितेंद्र आव्हाड

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वत:च केला खुलासा म्हणाली…

पोलीस मारहाण प्रकरणात ‘या’ भाजप आमदाराला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या