बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात टिकटॉक पुन्हा दाखल होणार, ‘या’ नव्या नावासह परतण्याची शक्यता

नवी दिल्ली | मोदी सरकारने गेल्यावर्षी संपूर्ण देशभरात शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप ‘टिकटॉक’सह इतर 59 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी आणली होती. या अॅप्समधील ‘पब्जी’सारखे काही अॅप्स आता नव्या रुपात परतले आहेत. पब्जीनंतर आता थोड्याच दिवसात टिकटॉक देखील भारतात परत येण्याची शक्यता आहे. यामुळे टिकटॉक प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी समजली जात आहे.

‘बाईटडान्स’ या टिकटॉक कंपनीने नवीन नाव रजिस्टर करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. बाईटडान्सने डिझाईन, पेटंट आणि ट्रेड मार्कसाठी महानियंत्रकांसोबत शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ अ‍ॅपसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे.

माहितीनुसार, Tik Tok ने आता Tick Tock  या नावाने ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. टिपस्टर मुकुल शर्मा याने याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृतरित्या यावर काहिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, टिकटॉक बंदीसाठी सरकारने नोटीस पाठवल्यानंतर टिकटॉकच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं की, भारत सरकारकडून 29 जून 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करणारी टिकटॉक पहिल्या कंपन्यांपैकी एक होती. आम्ही सतत स्थानिय कायदे आणि नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच सरकारच्या कोणत्याही समस्येचं समाधान करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्व युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा सुनिश्चित करणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात जानेवारीनंतर सर्वात कमी रूग्णांची नोंद

‘संजय राऊतांनी ‘हे’ काम बंद करावं’; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सल्ला

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

अभिनेत्रींना ‘हे’ आश्वासन देऊन करुन घ्यायचे बोल्ड सीन्स, मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More