बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तोपर्यंत RSSचा आरक्षणाला भक्कम पाठिंबा”

मुंबई | सध्या राज्यासह देशभरात आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. विविध राज्यात मोठी लोकसंख्या असलेल्या समाजाकडून आरक्षणाची मागणी होताना दिसत आहे. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटताना दिसतोय. त्यामुळेच आता केंद्र सरकारने 127 वी घटनादुरूस्ती करत राज्यांना आरक्षणाचा अधिकार दिला आहे. त्यातच आता आरएसएसने देखील आरक्षणाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा म्हणजेच आरएसएसचा आरक्षणाला भक्कम पाठिंबा आहे. जोपर्यंत समाजातील एखाद्या घटकाला असमानतेची वागणूक मिळते तोपर्यंत आरक्षण सुरू ठेवलं पाहिजे, असं मत आरएसएसचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केलं आहे. भाजप आरएसएसच्या सांगण्यावरून आरक्षण संपवायला निघालेत, असा आरोप काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून करताना दिसत आहे. त्यामुळे दत्तात्रय होसबाळे यांच्या वक्तव्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

दलितांच्या इतिहासाशिवाय भारताचा इतिहास पुर्ण होऊ शकत नाही. सामाजिक न्याय हा आमच्या राजकिय धोरणाचा विषय नाही तर, आमच्या श्रद्धेचा विषय आहे, असंही दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटलं आहे. समाजातील बदलांसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर जातीचा शिक्का मारणं चुकीचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर भाजप करत असलेली नाटकं थांबवावीत. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण संपवण्याचा डाव भाजप आणि आरएसएस आखत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने याआधी केला होता.

थोडक्यात बातम्या-

कुस्तीपटू विनेश फोगट निलंबित! ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं WFI ची धडक कारवाई

मुंबईकरांची पाससाठी रेल्वे स्थानकावर गर्दी, वाचा पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

“लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरुनच काम करणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More