“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Tillotama Shome | बॉलीवुड अभिनेत्रींना कधी फॅन्सकडून तर कधी गर्दीतील लोकांकडून अनेकदा नाहक त्रास झाला आहे. चाहते बऱ्याचदा आपली मर्यादा ओलांडून कलाकारांसोबत गैर वर्तन करत असतात. याचे अनेक किस्से प्रचलित आहेत. अशात एका अभिनेत्रीने दिल्लीतील प्रवासादरम्यानचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव पहिल्यांदाच शेअर केला आहे.तिने एका विचित्र परिस्थितीला तोंड दिल्याचं अभिनेत्रीने (Tillotama Shome) सांगितलं.

‘लस्ट स्टोरीज 2’ व ‘त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपर’ अशा वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे तिलोत्तमा शोम होय. तिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिलोत्तमाला राजधानी दिल्लीत हा भयंकर अनुभव आला होता.

अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

एक दिवस मी एका ठिकाणी बसची वाट बघत होती. तेव्हा थंडीचे दिवस होते आणि जरा अंधारच पडला होता. तेव्हा एक कार माझ्या जवळ येऊन थांबली, त्या कारमध्ये सहा जण होते. त्यांना पाहून मला भीती आणि खूपच अस्वस्थ वाटले. त्यामुळे मी तिथून थोडं लंब गेले.

मात्र, त्यांनी नंतर माझ्याकडे पाहून विचित्र हावभाव करायला सुरुवात केली, तसेच कोणीतरी माझ्यावर एक छोटा दगड फेकला. तेव्हा मला लक्षात आलं की मी आता इथून निघायला हवं. मी तिथून पळण्याचा विचार केला, पण ते कारमध्ये होते, त्यामुळे मला सहज पकडू शकले असते. मग मी रस्त्याच्या मधोमध उभं राहून मदत मागायचं ठरवलं, असं अभिनेत्रीने (Tillotama Shome) एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

“गाडीतील ड्रायव्हरने पँटची चैन उघडली आणि..”

पुढे ती म्हणाली की, मी पुढे गेल्यावर रस्त्यावर बऱ्याच गाड्या गेल्या. मला मेडिकल साइन असलेली एक कार दिसली. मला वाटलं की डॉक्टरची गाडी आहे, तर मी सुरक्षित राहीन. मी त्या गाडीत पुढच्या सीटवर बसले. पण काही वेळाने गाडीच्या ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडली आणि माझा हात पकडला. त्याने जबरदस्तीने माझा हात त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, पण माझा हात आपोआप झटक्यात मागे गेला. अशात तो ड्रायव्हर पण गोंधळून गेला आणि त्याने मला गाडीतून खाली उतरण्यास सांगितलं, असा धक्कादायक अनुभव अभिनेत्री तिलोत्तमा शोमने (Tillotama Shome) सांगितला आहे.

हे सगळं काही अत्यंत धक्कादायक असल्याचं यावेळी अभिनेत्री म्हणाली. तसंच, या घटनेनंतर मी घरी न जाता मैत्रिणीकडे गेले होते,असंही अभिनेत्री म्हणाली.

News Title – Tillotama Shome shares shocking experience

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढला; आणखी 9 रुग्ण आढळल्याने खळबळ

“..ते सगळं ऐश्वर्याला कधीच मान्य नव्हतं”; सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर

SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ करा झटपट अर्ज

वरळीत पुन्हा हिट अँड रन; अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले

राज्यात पावसाचा जोर ओसरला तरी धोका कायम; पुढचे 4 दिवस..