सिडनी | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून येतंय. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने अंपायरची हुज्जत घातल्याने तो सध्या चर्चेत आहे.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम पेन डीआरएसमुळे चर्चेत आला. टीम पेनने डीआरएसचा निर्णय विरोधात गेल्याने अंपायरशी हुज्जत घालत अपशब्दही वापरले.
चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत असताना शॉर्ट लेगवर कॅचसाठी अपील करण्यात आलं. त्यावेळी मैदानावर उपस्थित असलेले अंपायर पॉल विल्सन यांनी नाबाद दिलं. यानंतर पेननं त्वरित डीआर घेतला. मात्र त्यात चेंडू बॅटला लागला नसल्याचं दिसलं. स्निको मीटरमध्ये बॅटच्या बाजूने जाताना दिसला मात्र पुजाराला बाद करण्यासाठी तेवढं पुरेसं नव्हतं.
यापूर्वीच्या मॅचमध्ये पेनला स्निकोच्या पुराव्याच्या आधारावर आऊट देण्यात आलं होतं. यावरून पेनने विल्सन यांच्याशी हुज्जत घातली. शिवाय चिडलेल्या पेननं शिवीगाळ देखील केली. पेनचं हे कृत्यू सोशल मिडीयावर व्हायरल झालंय.
Australia lose a review trying to prize out Pujara. Another fantastic decision by the umpire #AUSvIND pic.twitter.com/k1coiuhI1W
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
थोडक्यात बातम्या-
रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!
‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल
औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….
…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!