Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“ठाकरे सरकारच्या नेत्यांचा वेळ कामधंदे सोडून ‘या’ गोष्टींमध्ये जातोय”

Photo Courtesy- Facebook/Nilesh Rane-Uddhav Thackeray

मुंबई | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबतच राज्यातील महाविकास आघाडीवर असलेल्या नेत्यांवर सुद्धा राणेंनी निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकारच्या नेत्यांचा वेळ काम-धंदे सोडून फक्त आणि फक्त गुन्हे करण्यात जात आहे. तरी या नेत्यांची हक्कलपट्टी करण्याची मागणी निलेश राणेंनी केली आहे. “पुजा चव्हाण प्रकरणी काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यातला ऑडिओ तर समजतोच ना, तुमच्या मंत्र्याचा आवाज तुम्हाला समजत नाही का? त्यांची हकालपट्टी करा, घरी बसवा, कारवाई केली जाईल,’ असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी मागे एका इंजिनिअरला त्यांच्या घरी मारहाण केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असुन त्यांनी स्वतः याची कबुली दिली होती. तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई का नाही करण्यात आली? जो चुकला तर चुकला म्हणा, अशांना खतपाणी घालू नका. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच घाणेरड्या लोकांना खतपाणी घातले नाही, असंही त्यांनी म्हटलं.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या दुसऱ्या बायको-मुलांची माहिती लपवून ठेवली, या घटनेबाबत आम्ही बदनामी केली का? त्यांनी स्वतः कबुली दिली तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई का नाही करण्यात आली? असा सवाल देखील राणेंनी ठाकरे सरकारला केला आहे.

थोडक्यात बातम्या-

खडसेंनी दिलेला ‘तो’ इशारा खरा करुन दाखवला, भाजपला जबर धक्का!

सैराटमध्ये लंगड्याची भूमिका साकारणाऱ्या तानाजीलाही लागली लॉटरी!

Happy Birthday माँ… केक अब फीका लगता है!

चुकीला माफी नाही… मुंबई पोलिसांनी रणबीरची गाडी घेतली ताब्यात!

मुंबई-पुण्यातील ही गोष्ट आता कोल्हापुरातही, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या