Top News

संभाजी भिडे गुरूजीचं डोकं तपासायची वेळ आलीय- अजित पवार

पुणे | राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी श्रीशिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंवर जोरदार टीका केली आहे. आंबा खाऊन मुलगा होईल, अशी वक्तव्य करणाऱ्या गुरुजींचे डोके तपासायची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होेते.

पूर्वीच्या काळी गावातील गुरूजींना मान होता, त्यांचा आदर केला जायचा पण सध्या काही गुरूजी द्वेषाची गरळ ओकत आहेत, म्हणून अशा गुरूजींची डोके तपासायची वेळ आली आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, मराठा समाज आंदोलन करत आहे. त्याला कुणाचे नेतृत्व नाही. तो एक प्रकारचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून चुकीची आणि चिथावणी देणारी वक्तव्यं केली जात आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-आमदार शरद सोनावणेंची कोलांटउडी; म्हणतात, “राज ठाकरे हेच खरे गुरु!”

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-पंकजा मुंडे बालिश, ती काय चिक्कीची फाईल आहे का?- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या