बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॅाकडाऊनमुळं नोकरी गेली, कुटुंबावर स्मशानात राहण्याची वेळ; काम ऐकाल तर तुम्हाला अभिमान वाटेल!

नवी दिल्ली | कोरोनाने सध्या देशभरात हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा झपाट्यान वाढत चालला आहे. कोरोनाने मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. स्मशानभूमीतही मृतांवर अंतिम संस्कार करण्यासाठी वेळ लागत असून लाईन लावावी लागत आहे. मात्र एका व्यक्तिने आपली नोकरी गेल्यावर मृतांवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी उचलली आहे. कन्हैयालाल शिर्के असं त्याचं नाव आहे.

कन्हैयालाल महाराष्ट्रातून उदरनिर्वाहासाठी वडोदरा येथे आले होते. मागील वर्षी ते वडोदराला आले होते आणि त्यावेळी लॉकडाऊन लागलं आणि त्यांची नोकरीही गेली. तेव्हापासून कन्हैयालाल वडोदरातील वासना गावातील स्मशान घाटावर राहून मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याचं काम करत आहेत.

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली त्यानंतर जवळ होते तेवढे पैसेही संपले. मग कन्हैयालाल आपल्या कुटुंबाला घेऊन स्मशानात राहु लागला. आता तो तिथेच काम करत आहे. कोरोनाने मरण पावलेल्या मृतांवर अंतिम संस्कार करण्याचं तो काम करतो. महत्त्वाचं म्हणजे या कामात त्याला त्याची पत्नीही मदत करते. तो गुजरातमधील वडोदरायेथील वासना स्मशानभूमीत आपल्या कुटुंबासोबत राहतो.

दरम्यान,  लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली त्यानंतर स्मशान घाटावर आलो. येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांना, घाबरुन कोणी हात लावायलाही तयार नव्हतं. ज्यांनी आपली व्यक्ती गमावली त्यांचं दुःख मी कमी करू शकत नाही. अखेरचा निरोप देण्याचं काम मी करू शकतो, असं कन्हैयालालने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल, FIR मध्ये अत्यंत धक्कादायक माहिती

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ झाल्याने त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत”

कोरोनाचा हाहाकार सुरुच, एकाच दिवसात तीन आमदारांचा मृत्यू झाल्यानं खळबळ

60 वर्षीय पुणेकर महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात, आयफोनचं लालच दाखवून 4 कोटी लुटले!

“कोरोनाच्या संकटात पाकिस्तान भारतासोबत ठामपणे उभा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More