“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?”
देहरादून | उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आणि भाजप नेते तिरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?, असा सवाल तिरथ सिंह रावत यांनी केला आहे.
तिरथ सिंह रावत नैनितालमध्ये आयोजित एका सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य 5 किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात 10 सदस्य आहेत त्यांना 50 किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं, असंही तिरथ सिंह रावत म्हणाले.
मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण 20 मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल, असं तिरथ सिंह म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आस जागवली. त्यांच्या जागेवर इतर कुणाचं नेतृत्व असतं तर भारताची कशी अवस्था झाली असती माहिती नाही. देशाची स्थिती वाईट झाली असती, पण मोदींनी आपल्याला मदत देण्याचं काम केलं, असं तिरथ सिंह रावत यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…
‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान
उठसुट राजीनामा मागणं असा उद्योग विरोधकांचा सुरु झालाय- संजय राऊत
“राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्तेची इतकी लालसा आहे की…”
ना अजित पवार, ना जयंत पाटील; शरद पवार आपल्या ‘या’ विश्वासू माणसाकडे सोपवणार गृहमंत्रिपद?
Comments are closed.