बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील कासगंजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर या घटनेमधील कंटाळलेल्या पतीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं उचलेलं पाऊल हे त्याच्या पत्नीच्या अफेअरला कंटाळून उचलत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

संबंधित मृत व्यक्तीचं नाव नबी हसन असं आहे. नबीच्या शेजारी राहणाऱ्या तौफीकसोबत नबीच्या पत्नीचं अफेअर सुरू आहे. जेव्हाही तो पत्नीला घेऊन दिल्ली, गाझियाबादला गेला तेव्हा तेव्हा तौफीकही तिथं पोहोचला होता. अनेकदा तौफीकला असं न करण्यास सांगून देखील त्याने काही ऐकलं नाही. त्यामुळे नबी त्याच्या पत्नीला घेऊन पटियालामध्ये आपल्या घरी राहू लागला.

बऱ्याचदा समजावून सांगितल्यावरही तौफीक काही सुधरला नाही. या कारणामुळे नबी हसनने याबाबत तौफीकच्या परिवाराकडे तक्रार केली. मात्र त्याला समजावण्याऐवजी त्याच्या भावाने आणि वडिलाने नबी हसनलाच घरात घुसून मारहाण केली. एवढंच नाही तर या सर्व प्रकरणात त्याची पत्नीही आरोपींची साथ देत होती

दरम्यान, नबीला त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या घटनेमुळे धक्का बसलेल्या नबी हसनने आत्महत्या केली. व्हिडीओमध्ये नबीने डीएमकडे आपल्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच व्हिडीओ तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारने कंपन्याना महाराष्ट्रात रेमडेसिवीर न पुरवण्यास सांगितलंय’; नवाब मलिक यांचा धक्कादायक खुलासा

वसंत मोरेंनी हॉटेलमध्ये 40 ऑक्सिजन बेड उभारले, पुण्याच्या नगरसेवकांना दाखवला आरसा

19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; कारण ठरली मामाची पोरगी

‘गिधाडांनो त्या कार्तिकला एकटं सोडा; आता त्याला फासावर जाण्यास भाग पाडू नका”

देशभर चिता जळत आहेत, शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका- संजय राऊत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More