बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकतर्फी प्रेमातून विवाहितेनं उचललं हे टोकाचं पाऊल!

नवी दिल्ली | एकतर्फी प्रेमातून तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना समोर येत आहे. एकतर्फी प्रेमातून लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. मात्र एकतर्फी प्रेम किती घातक असू शकतं आणि याचे परिणामही तितकेच गंभीर असू शकतात हे या घटनेवरुन समोर येत आहे.

एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी दबाव आणि सतत मिळणाऱ्या धमकीमुळे कंटाळलेल्या तरुणीनं आत्महत्येचं धक्कादायक पाऊल उचललं असल्याचं समोर येत आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आरती असून तीचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. आरतीच्या सासरी राहणाऱ्या एक तरूणाचं तिच्यावर प्रेम जडलं होतं. तिचा पती घरी नसल्यावर तो मुलगा तिला त्रास देत असे. बऱ्याच वेळा त्यानं जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला होता.

काही दिवसांनंतर आरती आपला पती विष्णूभाई आणि मुलांसह अहमदाबाद येथे राहायला आली होती. त्या तरुणाला समजतास तोही तिकडे भाड्यानं घर घेऊन राहण्यास आला. आरती माहेरी गेली असताना तोही तिच्या माहेरी गेला आणि त्याच्यासोबत येण्यास सागितलं. आरतीनं नकार दिल्यास वडिलांना आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, या गोष्टी आरतीच्या पतीस समजल्यावर त्यानं आरतीच्या वडिलांना कळवलं. मात्र दुसऱ्याच दिवशी आरतीनं सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या –

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आजचे ताजे दर

शेतकऱ्याला राग अनावर; भररस्त्यात भाजप नेत्याचे कपडे फाडले, पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोनाच्या बदलत्या रूपानं लक्षणातही होतोय बदल

कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; फायनलमध्ये धडक

“जनसामान्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More