बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टिश्यू पेपरची किंमत चक्क कोटींमध्ये; तब्बल ‘इतक्या’ कोटीला विकला गेला ‘तो’ खास टिश्यू पेपर

नवी दिल्ली | अर्जेंटिनाचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सी याने नुकताच मोठा निर्णय घेतला होता. मेस्सीने तब्बल 17 वर्षापासून खेळत असलेला बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने पत्रकार परिषद घेत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. त्यावेळी मेस्सीच्या चाहत्यांनी त्याला टाळ्याच्या कडकडाटात त्याला निरोप दिला. त्यावेळी मेस्सी पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला होता.

निरोपाच्या भाषणासाठी मेस्सी बोलण्यासाठी उभा राहिला. त्यावेळी चाहत्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. तेव्हा चाहत्यांचं प्रेम पाहून मेस्सी भावूक झाला आणि रडायला लागला. त्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहून मेस्सीची पत्नी अँटोनेलाने त्याला एक टिश्यू पेपर दिला. आता याच टिश्यू पेपरची किंमत कोटींमध्ये लागली आहे.

मेस्सीने अश्रू पुसलेल्या टिश्यू पेपर चक्क 7.43 कोटीला विकला गेला आहे. या टिश्यू पेपरच्या विक्रीची जाहिरात ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली होती. त्यानंतर अवाजवी दराने याची विक्री केली गेली आहे. मैकेडुयो नावाच्या व्यक्तीने हा टिश्यू पेपर विकत घेतला आहे.  टिश्यू पेपर चक्क कोंटीमध्ये विकला गेल्यानं सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पॅरीस सेंट जर्मनसोबत मेस्सीचा करार झाला असून तो आता या क्लबसाठी खेळणार आहे. मेस्सीला या क्लबकडून वर्षाला 257 कोटी मिळणार आहे. या क्लबमध्ये मेस्सीचा जुना मित्र नेयमार ज्युनियर आणि फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एमबापे देखील असल्यानं आता पॅरीस सेंट जर्मनचं पारडं जड झालंय.

थोडक्यात बातम्या-

भाजपविरूद्ध सोनिया गांधींचा मोठा प्लॅन; ‘या’ खास नेत्यांना दिलं निमंत्रण!

“आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच”

“देशमुखांच्या 100 कोटीत शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हिस्स्याची चौकशी झाली पाहिजे”

“योगी आदित्यनाथ म्हणजे राजकारणातील राम”

नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला दुग्धाभिषेक आणि गोमूत्राने शुद्धीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More