अजितदादांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात; खास व्हिडिओ केला शेअर

Titeeksha Tawde supports Ajit Pawar

Ajit Pawar | विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्षाकडून यासाठी जोरदार प्रचार केला जातोय. अशात एका मराठी अभिनेत्रीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेत्रीने घड्याळाला पाठबळ देण्याचं आवाहन केलं आहे. तिचा हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे. (Ajit Pawar)

अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) हिने नुकतच अजित पवारांना मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील लाडकी बहिण योजनेचा प्रचार करत महायुती सरकारला मत देण्याचं आवाहन केलंय.

तितिक्षा तावडेची पोस्ट व्हायरल

यानंतर तितिक्षा तावडेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. तितिक्षानेही तिच्या सोशल मीडियावर अजित पवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तितीक्षाने लाडकी बहिण योजनेचंही कौतुक केलंय. दादाचा वादा असा हॅशटॅगही तिने आपल्या व्हिडिओ पोस्टला वापरला आहे.

“अजित दादांनी राज्यातील अडीच कोटी महिलांना लाडकी बहिण बनवत, महिन्याला 1500 रुपयांचा लाभ देऊन आर्थिक स्वावलंबनाचं पाठबळ दिलंय. या योजनेमुळे महिलांना मिळालेला लाभ आणि बळ पाहता पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर आपल्या या लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देण्याचा अजिदादांचा वादा आहे. चला तर मग, येत्या 20 नोव्हेंबरला घडयाळ्याचं बटण दाबून महायुतीला बळकट करूयात.”,असं व्हिडिओमध्ये अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तितिक्षा तावडेकडून घड्याळाला पाठिंबा देण्याचं आवाहन

अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन देत म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांनी कायम आपल्या सर्वांच्या हितासाठी लोककल्याणकारी भूमिका बजावली आहे. आपल्या दादांमुळे कित्येक लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभातून त्यांच्या संसाराला मदतीचा हात मिळाला आहे. येत्या काळात तोच लाभ 1500 वरुन 2100 करण्याचा दादांचा वादा आहे.  महिला सशक्तीकरणाच्या या कार्यात दादाला पाठबळ देऊया, लाडकी बहीण योजनेला सुरक्षित करूया! त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबरला घड्याळाचे बटण दाबा!.. अभिनेत्री तितिक्षा तावडेची ही पोस्ट आता चर्चेत आली असून ती प्रचंड व्हायरल झाली आहे.

News Title –  Titeeksha Tawde supports Ajit Pawar 

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! तब्बल 5 हजारांनी सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

राणेंची पुन्हा दमदाटी, उद्धव ठाकरेंना कोकणात पाऊल ठेवण्यापूर्वीच दिलं ओपन चॅलेंज

“निवडणूक संपण्याची वाट बघतोय, नंतर..”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा

“..म्हणून पवारांनी अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही”; भुजबळांचा गौप्यस्फोट

प्रेमात यश ते व्यवसायात भरभराटी, आज कुणाचं भाग्य उजळणार?; वाचा राशीभविष्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .