विनेश फोगाटला भारतरत्न आणि खासदारकी मिळणार? ‘या’ पक्षाने केली मागणी

Vinesh Phogat l भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक हुकले आहे. तिने 50 किलो गटात अंतिम फेरी गाठली होती, पण सामन्यापूर्वी तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला बाद ठरवण्यात आले आहे. विनेश फोगाटची गणना जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंमध्ये केली जाते. अशातच आता विनेश फोगाट संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

विनेश फोगाटला भारतरत्न द्या : तृणमूल काँग्रेसची मागणी

विनेश फोगाटला वजनाच्या कारणामुळे अपात्र घोषित करण्यात आले आहे. विनेशला अपात्र घोषित केल्यानंतर भारतभर नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले आहे. तर, संसदेत देखील या प्रकरणावरुन मोठा गदारोळ झाला आहे. त्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी देखील विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याप्रकरणी निवेदन सादर केलं आहे.

मात्र आता तृणमूल काँग्रेसकडून विनेश फोगाटला भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. विनेश फोगाटला भारतरत्न द्या किंवा राज्यसभेची खासदारकी तरी द्या अशी मागणी तृणमूल काँग्रेसने चांगलीच लावून धरली आहे. त्यामुळे आता या मागणीवर काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vinesh Phogat l विनेश फोगाटने भावनिक ट्विट करत निवृत्तीची केली घोषणा :

पॅरिस ऑलिम्पिकमधील अनपेक्षित निकालानंतर भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. ऑलिम्पिक फायनलच्या काही तास आधी, वजन मोजताना 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. हा धक्का सहन न झाल्याने विनेशने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून कुस्तीला अलविदा केल आहे.

विनेश फोगटने वजन कमी करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. तिने रात्रभर उपवास, पाणी पिणे आणि घाम गाळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तिने केस देखील कापले मात्र प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

News Title : TMC Demands Bharat Ratna Or Rajya Sabha Seat For Vinesh Phogat

महत्त्वाच्या बातम्या-

या दोन राशींची होणार चांदी; गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ 2 राशींना मिळणार पैसाच पैसा

क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी, युवा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

‘काल ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी खेळण्याआधी…’; बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत

आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

खुशखबर! 12 वी पास तरुणांना ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी