Top News देश

तृणमूल काँग्रेस अडचणीत; ममता बॅनर्जींच्या आणखी एका आमदाराने दिला राजीनामा

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर आली असताना ममता बॅनर्जी सरकार अडचणीत आलं आहे.  तृणमूलचे आमदार जितेंद्र तिवारी आणि शीलभद्र दत्त यांनी राजीनामा दिला आहे.

बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर जितेंद्र तिवारी आणि आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे.  शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे.

दोन नेत्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. कबिरूल इस्लाम यांनीही राजीनामा दिल्याने तेही आता पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती रोखण्यासाठी लवकरात लवकर काही हालचाल ममता बॅनर्जींना करावी लागणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावलाय”

उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन

विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा-अशिष शेलार

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्याची आवश्यकता- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या