बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ

कोलकाता | बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारानं भर पत्रकार परिषदेत एका महिला आमदाराच्या गालाला हात लावल्याचं दिसतंय.

लोकसभेतील खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात एका पत्रकार परिषदेदरम्यान तृणमूल काँग्रेसचा एक खासदार पक्षातील एका महिला आमदाराचा गाल ओढताना दिसतो आहे. यावरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

लॉकेट चॅटर्जी यांनी हे नेते म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचं सांगितलं आहे. तसेच टीएमसी अशाच प्रकारे महिला सक्षमीकरण करत आहे की काय? हे आहेत टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी. हे बांकुराच्या आमदाराचा गाल ओढत आहेत जी तिकीट न मिळाल्यानं नाराज होती. अरे, लाज वाटली पाहिजे, अशी टीका चॅटर्जी यांनी केली आहे. मात्र कल्याण बॅनर्जी यांच्या या व्हिडिओवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. मात्र या व्हिडिओबाबत कल्याण बॅनर्जी यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलं नाही.

पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर 2 मे रोजी मतमोजणी होईल. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या 291 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 50 महिलांना तिकीट देण्यात आलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव

पुण्यात मनसेने केक कापून साजरा केला कोरोनाचा वाढदिवस!

‘भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे, पण…’; मिथुन चक्रवर्ती आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जुंपली

देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केलाय- नाना पटोले

‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More