‘तारक मेहता..’ मधील भिडे मास्टरने केली निर्मात्यांची पोलखोल?, मालिकाही सोडणार?

TMKOC | सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. दयाबेन, तारक मेहता, टप्पू, गोली, सोनी यांसारख्या भूमिकांची जागा आता नव्या कलाकारांनी घेतली आहे. अशात प्रेक्षकांसाठी एक वाईट (TMKOC) बातमी समोर आली आहे.

मालिकेमधील आणखी एक प्रसिद्ध कलाकार ही मालिका सोडून जात असल्याची जोरदार चर्चा आहे. ‘तारक मेहता..’मध्ये आत्माराम भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांडवडकर लवकरच मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

भिडे मास्तर सोडणार ‘तारक मेहता..’ मालिका?

युट्यूबवर मंदार यांचा एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भिडेने हात जोडत निर्मात्यांची पोलखोल करून शो सोडला असं म्हटलं आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

या व्हायरल व्हिडिओ आणि चर्चेबाबत अखेर भिडे उर्फ मंदार चांडवडकर यांनी मौन सोडलं आहे. याबाबत मंदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मंदार यांनी स्पष्ट केलंय की युट्यूबवर व्हायरल होणारे फोटो हे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन  घेतले असून त्यातील सर्व माहिती ही खोटी आहे.(TMKOC)

भिडे उर्फ मंदार चांडवडकर यांचा व्हिडीओ व्हायरल

“मी तारक मेहता.. या मालिकेला 16 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह केला होता. त्यातूनच त्यांनी फोटो उचलले आहेत आणि माझा खोटा व्हिडीओ बनवला आहे. हाच व्हिडीओ त्यांनी युट्यूबवर पोस्ट केला आहे. मला माझ्या पत्नीकडून या व्हायरल व्हिडीओविषयी समजलं. पण हा व्हिडीओ फेक आहे”, असं मंदार यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, मी ही मालिका सोडणारही नाही आणि त्याबद्दल मला कोणतीच पोलखोलही करायची नाही, असंही मंदार उर्फ भिडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ही फक्त एक अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मालिकेत ‘गोली’ची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने मालिकेचा निरोप घेतला आहे.(TMKOC)

आतापर्यंत दिशा वकानी (Disha Vakani), शैलेष लोढा, जेनिफर मिस्त्री, गुरुचरण सिंगसह काही कलाकारांनी हा शो सोडला. त्यानंतर आता कुश शाहने देखील ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः कुशनेच हा शो सोडल्याची माहिती एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली होती.(TMKOC)

News Title –  TMKOC fame mandar chandwadkar aka bhide on qutting show

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांना मोठा झटका, बारामती शेजारचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

युवा पिढीला रोजगार मिळणार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात औद्योगिक शहर वसणार

PPF आणि सुकन्या समृद्धी अकाउंट असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

महिलांना अशाप्रकारे घरबसल्या करता येणार पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार

नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा