TMKOC Sodhi aka Gurucharan Singh | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत ज्या अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं तो काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. तब्बल 25 दिवसांनंतर अभिनेता घरी परतला होता. रोशन सिंग सोढी उर्फ गुरुचरण सिंह (TMKOC Sodhi aka Gurucharan Singh) याने मालिका सोडून बरीच वर्षे झाली आहेत. मात्र, त्याच्या भूमिकेमुळे तो अजूनही चाहत्यांच्या मनावर राज्य करून आहे.अशात अभिनेत्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अभिनेता गुरुचरण सिंह हा काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. त्याने काल (7 जानेवारी) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. हा व्हिडिओ पाहून चाहते देखील चिंतेत पडले आहेत.
सोढी उर्फ गुरुचरण सिंहची प्रकृती बिघडली
या व्हिडीओमध्ये गुरुचरणला सलाईन लावल्याचं दिसून येतंय. अभिनेत्याने माझी प्रकृती बरीच खालावली आहे, असं म्हटलंय.गुरुचरणचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील काळजी व चिंता व्यक्त केली आहे. त्याला नेमकं झालंय तरी काय?, त्याची अवस्था अशी का झाली? असे सवाल सोशल मीडियावर चाहते उपस्थित करत आहेत. (TMKOC Sodhi aka Gurucharan Singh)
शेअर केलेल्या व्हिडिओत गुरुचरण म्हणाला की, “माझी तब्येत खूपच बिघडली आहे. रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या असून माझ्या प्रकृतीबाबतची माहिती तुम्हाला लवकरच देईन.” तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘काल गुरू पुरबच्या दिवशी गुरु साहेबजींनी मला एक नवीन आयुष्य दिलं. मी त्यांचे आभार मानतो.’
View this post on Instagram
गुरुचरण सिंह ‘तारक मेहता..’चा होता भाग
गुरुचरणच्या या व्हिडिओवर आता चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘पाजी, नेमकं काय झालंय तुम्हाला’, असा प्रश्न एकाने विचारला. तर ‘लवकरात लवकर बरे व्हा’, असं दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलंय.चाहत्यांनी तो लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना देखील केली आहे. सध्या अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. (TMKOC Sodhi aka Gurucharan Singh)
दरम्यान, गुरुचरण सिंह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारत होता. 2008 ते 2013 पर्यंत तो याचा भाग होता. मात्र, 2020 मध्ये त्याने ही मालिका सोडली. काही दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता, त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला होता. तेव्हा अभिनेता आर्थिक अडचणीत असल्याचे समोर आले होते. अशात तो प्रकृतीच्या कारणाने चर्चेत आलाय.
News Title – TMKOC Sodhi aka Gurucharan Singh hospitalised
महत्त्वाच्या बातम्या –
साऊथ सुपरस्टारचा दुबईत भीषण अपघात, अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल
आज तूळ, कुंभसह ‘या’ राशींना होणार धनलाभ; अश्विनी नक्षत्रात भाग्य उजळणार
संतोष देशमुख यांच्या मारहाणीच्या व्हिडीओमधून धक्कादायक माहिती समोर!