पतीचं गुप्तांग कापून माहेरी घेऊन जाणाऱ्या महिलेला अटक

चेन्नई | पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे झालेल्या भांडणातून त्याचं गुप्तांग कापून माहेरी जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केलीय. तमिळनाडूच्या वेल्लोरजवळील गुडियट्टममध्ये ही धक्कादायक घटना घडली.

सारासू आणि जगदीसन यांचा १४ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. त्यातून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. रात्री पती झोपल्यानंतर महिलेनं धारदार शस्त्रानं त्याचं गुप्तांग कापलं. शेजाऱ्यांनी त्याचा आरडाओरडा ऐकून त्याला रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, पोलिसांनी पत्नीला पकडलं तेव्हा ती माहेरी चालली होती. झडती घेतल्यानंतर पोलिसांना तिच्या पर्समध्येच पतीचं गुप्तांग मिळालं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या