बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंह यांना अटक करणार?; राज्य सरकारची न्यायालयात मोठी माहिती

मुंबई | अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी परमबीर यांनी या याचिकेतून केली आहे. परमबीर सिंह यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

परमबीर यांच्यासह 32 पोलीस अधिकाऱ्यांवर भीमराव घाडगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात भारतीय दंड संहिता आणि अॅट्राॅसिटी कायद्यासह विविध 22 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आलं आहे. दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती पी. बी वरळे आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

सदर घटना 2015 मध्ये घडली असताना गुन्हा 2021 मध्ये कसा दाखल करण्यात आला?, अशी विचारणा यावेळी उच्च न्यायालयानं केली. त्यावर राज्य सरकारला गुन्हा दाखल करून घ्यायचा नव्हता न्यायालयानं हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती तक्रारदाराच्या वतीनं दिली गेली.

दरम्यान, परमबीर यांच्याविरोधात चुकीच्या पद्धतीनं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत परमबीर यांना अटकेपासून संरक्षण देण्यात यावं अशी विनंती वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाकडे केली. याप्रकरणात चौकशी सुरू असून याचिकेवर उत्तर देण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी केली. पुढील सुनावणीपर्यंत परमबीर सिंह यांना अटक करणार नाही. अशी ग्वाही न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयानं सुनावणी 20 मे पर्यंत स्थगित केली आहे.

थोडक्यात बातम्या

आज अक्षय्य तृतीया! या दिवसाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

अकोल्यात जात पंचायतीनं करायला लावलं धक्कादायक कृत्य, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

लज्जास्पद! ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; सोशल मीडियावर संतापाची लाट

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार; लसीकरणावरून असदुद्दीन ओवेसी यांची टीका, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More