बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना नष्ट करण्यासाठी भाजप नेत्याचा शंखनाद, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर उतरले, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनाचा विळखा राज्यातच नव्हे तर देशभर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. तसेच देशात अनेक ठिकाणी लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये. अनेकांना बेडसाठी वणवण फिरावं लागतंय. तर अनेकांचा बेड आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. मात्र या संकटाच्या काळात अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. अशात मेरठमधील भाजप नेते गोपाल शर्मा यांनी कोरोनाला नष्ट करण्यासाठी एक अजब उपाय सांगितलाय.

मेरठमध्ये शंखनाद आणि होम-हवनाच्या धुरांमुळे कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्याची तयारी केली जात आहे. गोपाल शर्मा यांनी कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला आहे. गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो, असं म्हटलं आहे.

यज्ञ कुंडातील धुरामधून वातावरणातील हवा शुद्ध होते आणि धोकादायक व्हायरस नष्ट होतो. तसेच ऑक्सिजनचं प्रमाण देखील वाढतं असा दावाही गोपाल शर्मा यांनी केला आहे. गोपाल शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात गोपाल शर्मा हे सायकलवर एक यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी देखील गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचा अजब दावा केला होता. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘दोन हजार दे तुझी गाडी सोडतो’; पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे

दगडाने ठेचून तरुणाची हत्या; भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला

YouTube कडून महिन्याला मला ‘इतके’ पैसे मिळतात- नितीन गडकरी

मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय, शिवसेना आमदार खूश, राष्ट्रवादीचा मंत्री नाराज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More