बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तीन बायका फजिती ऐका! बायकांच्या हट्टापाई नवऱ्याने केलं असं काही की…

नवी दिल्ली | अनेक नवरे आपल्या पत्नीची इच्छा पुर्ण करता करता पूरते वैतागून जातात. त्यातच जर एखाद्याला तीन पत्नी असतील तर! मग तर काही विचारायलाचं नको, असंच काहीसं घडलंय एका आर्मी जवानासोबत (Army Soldier). या जवानाला तीन बायका आहेत. शिवाय हा जवान चक्क आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली आर्मीची नोकरी सोडून द्यायला देखील तयार झाला.

हा जवान इराकच्या आर्मीमध्ये नोकरी करत आहे. तो त्याच्या पत्नींच्या तक्रारीला एवढा वैतागला होता की, त्याने थेट आपल्या कमांडरकडे राजीनामाच सोपवला. त्यावर कमांडरही जवानाच्या राजीनाम्याचं कारण ऐकून हैराण झाला. त्यानंतर त्या कमांडरने जवानाचा राजीनामा स्वीकारण्याऐवजी उलट त्याला त्याच्या पत्नींना खुश करण्यासाठी भन्नाट मार्ग सुचवला.

खरं तर हा जवान नेहमी कामावर असे. शिवाय त्यानंतरही तो घरी गेला की, झोपण्यात आणि कामातच वेळ घालवत असे. त्यामुळे त्याला त्याच्या पत्नींना पुरेसा वेळ देता येत नसे. त्यामुळे त्याच्या तिन्ही पत्नी त्याच्याकडे सतत या कारणावरून तक्रार करत असत. शेवटी वैतागून त्याच्या पत्नींनी त्याच्याकडे नोकरी सोडण्याचा हट्ट केला. त्यामुळे जवानाकडेही दुसरा पर्याय उरला नाही.

मात्र, कमांडरने जवानाचे नोकरी सोडण्याचे कारण ऐकून एक मार्ग सुचवला. कमांडरने त्याला नोकरी सोडू नको असा सल्ला देत त्याला थेट 12 दिवसांची सुट्टीच देऊन टाकली. ज्यामुळे जवानाला त्याच्या पत्नींला प्रत्येकीला 4 दिवस असा वेळ देता आला. कमांडरच्या योजनेमुळे त्याच्या तिन्ही पत्नींच्या इच्छादेखील पुर्ण झाल्या आणि या जवानाला नोकरीही सोडावी लागली नाही.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

“शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा”, मनसेची मागणी

“कोलांटीउड्याच्या स्पर्धेत माकडही मागं पडतील, अधिवेशन आलं की यांची तब्येत बिघडते”

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More