बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वरातीला जाण्यासाठी टमटम भरुन निघाले, रस्त्यात पोलिसांनीच अशी काढली वरात!

पाटणा | कैमूर जिल्ह्यात लॉकडाउन पाळला जावा, यासाठी कैमूर पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. विनाकारण मज्जा म्हणून घराबाहेर पडलेल्यांना पोलिसांकडून चांगली शिक्षाही सुनावली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना एकदा विचार करावा. अन्यथा पोलिसांच्या नवनव्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.

भभुआमधील एकता चौकात असाच एक प्रसंग घडला आहे. टाटा मॅजिकवर अनेक जणं मोहनियाच्या दिशेने जात होते. पोलिसांना याबाबत विचारलं असता त्यांनी लग्नाचे  वऱ्हाडी असल्याचं सांगितलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी सर्वांना गाडीतून खाली उतरवलं आणि रस्त्यावर बेडूक उड्या मारायला सांगितलं. याशिवाय मास्क न घातलेल्यांचंही चलन कापलं.

मिळालेल्या माहितीनुसार, भभुआ पोलीस ठाण्याचे एसआय रणवीर कुमार यांनी सांगितलं की, लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी सातत्याने लोकांकडे अपील केली जात आहे. मात्र, तरीही अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरत असताना दिसत आहे. अशा लोकांना शिक्षाही केली जात आहे. याशिवाय जे लोक विमामास्क दिसतात त्यांचं चालानदेखील कापलं जात आहे.

दरम्यान, या घटनेबाबत एसआय यांचं म्हणणं आहे की, हे सर्व लोक वरातीत जाण्यासाठी एका गाडीवर बसले होते. मात्र, वरातीत जाण्यासाठी केवळ 20 लोकांना परवानगी आहे. यामुळे शिक्षा देण्यात आली.

थोडक्यात बातम्या – 

मुंबईच्या वेशीवर पोहोचले चक्रीवादळ; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

झाडं लावून झाडांच्या मुळांशी अस्थीविसर्जन, वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी मुलीचा स्तुत्य निर्णय

‘तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचं भारत प्रेम

DRDO चं ‘हे’ ॲंन्टी कोव्हिड औषध आजपासून बाजारात उपलब्ध शास्त्रज्ञ म्हणाले…

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More