“…म्हणून हिंदूंनी मुलींचं लग्न 18 व्या वर्षी लावून दिलं पाहिजे”

मुंबई | ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष आणि खासदार बदरूद्दीन अजमल(Badruddin Ajmal) यांनी नुकतेच हिंदू(Hindu) मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

अजमल यांनी आसाममधील करिमंगज येथे एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात लोकसंख्या वाढीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांसारखी(Muslim) झपाट्यानं वाढत नाही, ही त्यांची समस्या आहे. लोकसंख्या वाढीच्या बाबत मुस्लिम सुत्राचं अनुकरण करण्यासाठी हिंदूंनी त्यांच्या मुलींचं लग्न वयाच्या 10 ते 20 वयातचं लावून द्यावं.

पुढं ते असंही म्हणाले की, हिंदू योग्य वेळेत लग्न करत नाहीत. आधी दोन-तीन अफेअर करतात मग लग्न करतात. ते वयाच्या चाळीशीत लग्न करतात तेही घरच्यांच्या दबावाखाली. असं असेल तर त्यांची लोकसंख्या कशी वाढेन, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मुस्लिम मुलींसाठी कर्नाटक वक्फ बोर्ड दहा महाविद्यालयं उघडणार आहे. या महाविद्यालयांमध्ये हिंदू मुलींनाही प्रवेश द्यावा, असं अवाहन मी त्यांना करेन, असंही अजमल म्हणाले आहेत.

अजमल यांच्या या वक्तव्यानंतर आसाममधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आसाममधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत याला विरोध दर्शविला आहे.

राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका. अशी आया-बहिणींची विक्री करून त्यांची प्रतिष्ठा पायदळी तूडवू नका. आम्हाला मुस्लिमांकडून शिकण्याची गरज नाही, अशा शब्दात भाजप आमदार डी.कलिता यांनी अजमल यांना चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More