बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या वडिलांना…’; एनसीबीकडे शाहरूख खानबाबत आर्यनने केलं मोठं वक्तव्य!

मुंबई | मुंंबईतील कथीत ड्रग्स क्रुझ प्रकरणात एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेली आहे. आर्यन खानसोबत त्याच्या अन्य साथीदारांना देखील एनसीबीने अटक केलेली आहे. मुंबईतील एका क्रुझने आर्यन खान आणि त्याचे मित्र गोव्याला जात होते. या क्रुझवर त्यांची ड्रग्स पार्टी सुरू होती. एनसीबीने सापळा रचत या सर्वांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयानं 7 ऑक्टोंबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन खानसह त्याचे साथीदार असलेले मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, अरबाज मर्चंट आणि अन्य साथीदारांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरू असून त्यांचा जबाब नोंदवला आहे. आर्यनचा एनसीबीकडून चार पानांचा जबाब नोंदवला आहे. आर्यनने यामध्ये काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

आर्यनने आपल्या जबाबात म्हटलं आहे की, माझे वडील आपल्या कामात खूप व्यस्त असतात. आज माझे वडील एकाच वेळी तीन चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्यांच्या या कामाच्या व्यस्ततेमुळं मला त्यांची कधी कधी तर त्यांच्या व्यवस्थापकाकडून परवानगी घ्यावी लागते. तसेच माझ्या वडिलांनी परदेशात चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आहे, असं आर्यनने एनसीबीला सांगितलं आहे.

दरम्यान, एनसीबीच्या म्हणण्यानुसार आर्यन मागील तीन ते चार वर्षांपासून ड्रग्सचं सेवन करत आहे. एनसीबीला आर्यनच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह संभाषण सापडले आहेत. तसेच आर्यनने दुबई आणि युकेमध्ये देखील ड्रग्स घेतल्याचं म्हटलं आहे. एनसीबी आता या दिशेनं तपास करत असून याचे ठोस पुरावे शोधत आहे. जर पुरावे सापडले तर आर्यन खान आणि शाहरूख खानचा पाय आणखी खोलात जाणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

केंद्राने गरिबांच्या खात्यावर 1 लाख कोटी पाठवले- नरेंद्र मोदी

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

किती गोड! अस्वलाच्या पिल्लाला बर्फ पकडताना पाहून नेटकरी म्हणाले सगळा ताण विसरलो, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

‘आर्यन एक गुणी मुलगा, दुर्देवानं…’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आर्यन खानला पाठिंबा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More