बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

मुंबई | 2 ऑक्टोबर रोजी क्रुझवर केलेल्या कारवाईमुळे समीर वानखेडे आणि एनसीबी सध्या चर्चेत आहे. आर्यन खान प्रकरणावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. अलिकडेच नवाब मलिक यांना या प्रकरणाबाबत धमकी देणारा फोन आल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वादाला आता वेगळेच वळण लागलेलं दिसत आहे.

आर्यन खानवर केलेल्या कारवाईबाबत नवाब मलिक हे एनसीबीवर सातत्याने लक्ष्य ठेवून आहेत. या प्रकरणावरून राजस्थानमधून धमकी देणारा फोन येत असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये होते. त्याचवेळी समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीव आणि दुबईमध्ये काय करत होते? असा सवाल ही नवाब मलिक यांनी केला आहे. त्यानंतर मलिक यांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.

नवाब मलिक हे चूकीच्या गोष्टीच्या सांगत आहेत. मी मालदीवमध्ये माझ्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी गेलो होतो. त्यासाठी मी विभागाची रीतसर परवानगी घेतली होती. त्या ठिकाणी मी कुणालाही भेटलो नाही. अशा प्रकारच्या आरोपांना मी अजून काहीही उत्तर देऊ शकत नाही, असं समीर वानखेडेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, क्रुझवर टाकलेल्या धाडीमध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. बुधवारी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरूख खान आर्थर रोडवरील तुंरुगात गेला होता. त्यावेळी शाहरूख-आर्यन यांच्यामध्ये  15 ते 20 मिनिटांचा संवाद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

“अभिनेता आमिर खानने हिंदूच्या भावना दुखावल्या”

100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?- संजय राऊत

लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक ‘वन अविघ्न पार्क’ला भीषण आग!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More