बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’40 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार’

मुंबई | राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता यांचं काही दिवसांपूर्वीच ‘सच कहूँ तो’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्य व कलाविश्वातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. अशातच सध्या नीना आणखी एका कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या खूप आनंदी आहेत आणि कारण आहेत अमिताभ बच्चन. नीना गुप्ता पहिल्यांदा बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांचा आनंद द्विगुणीत झालाय. नीना गुप्ता यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये दमदार अभिनय केलाय. मात्र त्यांच्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये त्या पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

लोकांना हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल पण ‘गुडबाय’ हा असा सिनेमा आहे ज्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळतेय या गोष्टीचा मला आनंद आहे, असं नीना गुप्ता यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं.

दरम्यान, ‘गुडबाय’ या सिनेमात नीना अमिताभ यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ यांच्यासोबत चांगलं नातं आहे. मात्र जेव्हा त्यांच्या सोबत अभिनय करण्याची वेळ येते तेव्हा भीती वाटते. सुरुवातीला मी सेटवर खूप नर्वस होते. खरं सांगू तर त्यांच्या समोर अभिनय करताना एक दडपण होतं. मात्र नंतर काही काळाने आम्ही सेटवर खूप गप्पा मारू लागलो. आता सर्व सुरळीत आहे, असंही नीना यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

प्रेग्नसीनंतर ‘या’ आजारामुळे अनुष्का शर्माने कापले केस

“राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत, खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला”

आश्चर्यकारक! कोरोना लस घेतल्यानंतर तासाभरात पॅरालिसीस बरा झाला – रुग्णाचा दावा

देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, पण चिंता कायम, पाहा आकडेवारी

पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित; कमी झालेली संख्या पुन्हा वाढली

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More