मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसला 40 जागा देतो, अशी ऑफर वंचित बहुजन आघाडीने आज काँग्रेसला दिली होती. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘वंचित’चे हे वक्तव्य अतिशय गमतीशीर आहे, असं म्हणत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
देशात आणि राज्यात लोकशाहीला धोका निर्माण झालेला असताना काँग्रेसची भूमिका लोकशाहीचं रक्षण करण्याची आहे. काँग्रेसबरोबर धर्मनिरपेक्ष पक्षांनीदेखील हाच विचार करावा, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
दिलेला प्रस्ताव जर काँग्रेसला मान्य असेल तर त्यांनी 10 दिवसांत आमच्याशी संपर्क करावा, असं पत्रकार परिषद घेत वंचितने म्हटलं होतं.
दरम्यान, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी पक्षांनी एकत्र यायला हवं अशीच काँग्रेसची भूमिका आहे, असं देखील काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस पक्षाची भूमिका-
वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या जागा देण्याच्या वक्तव्यावर काँग्रेसची भूमिका pic.twitter.com/8Oao51szhZ
— Sachin Sawant (@sachin_inc) July 3, 2019
महत्वाच्या बातम्या-
-फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन; अनेकांना येतोय ‘हा’ प्रॉब्लेम
-ट्विटरवर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली; व्यंगचित्रांद्वारे हल्लाबोल
ममतांना मोठा झटका; हा महत्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला
-मॅच इंग्लंड-न्यूझिलंडची अन् टेन्शन पाकिस्तानला….!
-टिक टॉकची जादू… ३ वर्षापूर्वी घर सोडून गेलेला नवरा बायकोला परत मिळाला!
Comments are closed.