मुंबई | राज्यातील सत्तानाट्य आता काहीसे थंडावले असताना, देशात नवे नाट्य सुरु होण्याच्या तयारीत आहे. येत्या 18 जुलै रोजी भारताच्या नवीन राष्ट्रपतींची (President of India) निवडणूक होणार आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपेत्तर पक्षाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आता देशातील सर्व पक्षांचे आमदार आणि खासदार कोणाला मते देणार अशी चर्चा असताना, शिवसेनेच्या खासदारांनी भाजपच्या दौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची विंनती करणारे पत्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाठविले आहे. शिवसेनेचे आमदार फोडून आणि महाविकास आघाडी सरकार (MVA) पाडून शिवसेनेच्या वर्मी घाव घालणाऱ्या भाजपच्या (BJP) उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, असे मोठे धर्मसंकट उद्धव ठाकरेंवर कोसळले असून मोठा पेच निर्माण झाला आहे.
शिवसेना आता मुर्मूंनाच पाठींबा देण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व खासदारांची बैठक घेण्यात आली. यात सर्व खासदारांनी मुर्मूंना पाठींबा देण्याची विनंती केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. याविषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक ते दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करतील, असे राऊत म्हणाले.
शिवसेना नेहमी संगनमताने निर्णय घेते. यापूर्वीही आम्ही प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता, प्रणव मुखर्जींना पाठींबा दिला होता. दौपदी मुर्मूंना मते देणे म्हणजे भाजपला मत देणे किंवा पाठिंबा देणे असे नाही. यशवंत सिन्हा यांच्यासोबतही आमच्या सद्भावना आहेत. अशावेळी लोकभावना पाहून निर्णय घ्यावा लागतो, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
‘…तर सलमान खानला जीवानिशी मारु’, लॉरेन्स बिश्र्नोईने आणखी एकदा दिली धमकी
‘उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं तर…’, अपक्ष आमदाराचं मोठं वक्तव्य
शिवसेनेची हकालपट्टी मोहीम सुरुच, आणखी एका बंडखोर आमदाराला दिला नारळ
‘अब सभी को सभी से खतरा है’, संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ
आता विमानप्रवास करा फक्त 26 रुपयांत, व्हिएतजेट एअरलाईन्सची खास ऑफर
Comments are closed.