बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावलेला टेम्पो; पोलिसांनी पकडल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

पुणे |  खंडणी व आम्लपदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील फुरसुंगीजवळ एक टेम्पो पकडला असून तंबाखू, गुटख्याचा 10 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून त्यातून बेकायदेशीर रित्या तंबाखू व गुटखा या मालाची वाहतूक करण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली तेव्हा त्यात तंबाखू व गुटखा यांचा 9 लाख 14 हजार रुपयांचा माल असल्याचे आढळून आला. पोलिसांनी टेम्पोसह 12 लाख 14 हजार 529 रुपयांचा माल जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रसाद टिळेकर आणि अमोल पिलाणे यांना भेकराईमधील दोघे टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार त्यांनी सापळा लावला आणि तंबाखू व गुटख्याची बेकायदेशीर केली जाणारी वाहतूक थांबवून संपूर्ण माल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील मंदार राजेंद्र ठोसर आणि मनोज सुमतीलाल दुगड या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंगणाची क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी तुलना; ‘या’ अभिनेत्यानं केलं ट्विट

घरी बसून महिलांना फावल्या वेळात काम करण्याची संधी मिळणार!

पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!

पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून 2 कोरोनाबाधित कैद्याचं पलायन

बालिका वधू फेम सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More