बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 208 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 3695 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 412 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

169 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 159 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4107 झाली आहे.

दरम्यान, पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1698 एवढी आहे. तर आतापर्यंत 227 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तसेच आज 1733 लोकांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले

महत्वाच्या बातम्या-

“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

कोरोनामुळे लग्नाच्या खर्चात बचत; शेतकरीपुत्राची अनाथ मुलांच्या माहेर संस्थेला आर्थिक मदत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More