बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ ,नवी मुंबई मध्ये ७, रायगडमध्ये ७,  अकोल्यात ६, औरंगाबाद मध्ये ४, नाशिक ३,  सोलापूरात ३, सातारा -२, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २,अहमदनगरचा १, नंदूरबारचा १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५०  रुग्ण आहेत तर ४५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३४,०१८), बरे झालेले रुग्ण- (८४०८), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,५०७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७७८१), बरे झालेले रुग्ण- (२२२४), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४०८)

पालघर: बाधित रुग्ण- (७७१), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८१)

रायगड: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०१२), बरे झालेले रुग्ण- (७५०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)

धुळे: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)

जळगाव: बाधित रुग्ण- (५०५), बरे झालेले रुग्ण- (२१८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

पुणे: बाधित रुग्ण- (६६१४), बरे झालेले रुग्ण- (३०८६), मृत्यू- (२९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२३७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (२८७), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)

सातारा: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३४६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७)

सांगली: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३३५), बरे झालेले रुग्ण- (७९३), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८५)

जालना: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (२३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)

परभणी: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)

बीड: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)

अकोला: बाधित रुग्ण- (४८७), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३)

अमरावती: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)

नागपूर: बाधित रुग्ण- (४८४), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)

वर्धा: बाधित रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

भंडारा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधितरुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)

एकूण: बाधित रुग्ण-(५६,९९८), बरे झालेले रुग्ण- (१७,९१८), मृत्यू- (१८९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,१२५)

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

महत्वाच्या बातम्या-

“सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल”

आमदार रोहित पवार यांचं धाडस; पीपीई किट घालून पोहोचले रुग्णालयात

‘तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच पण त्याआधी…’; शिवसेना मंत्र्यांचं भाजपला आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More