बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात आज 3607 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, जाणून घ्या सर्व आकडेवारी…

मुंबई | राज्यात आज 3 हजार 607 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 97 हजार 648 वर पोहचली आहे. आज दिवसभरात उपचारानंतर 1 हजार 561 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 46 हजार 078 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात एकूण 47 हजार 968 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना चाचणीचं काम करत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 9 हजार 317 नमुन्यांपैकी 97 हजार 648 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 73 हजार 606 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 493 खाटा उपलब्ध आहेत. सध्या 28 हजार 66 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 152 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय ठाण्यात – 119 (मुंबई 97, मीरा-भाईंदर 9, कल्याण-डोंबिवली 7, नवी मुंबई 4, वसई-विरार 2), नाशिक – 5 (नाशिक 5), पुणे – 16 (पुणे 8, सोलापूर 8), कोल्हापूर – 1 (रत्नागिरी 1),औरंगाबाद – 8 (औरंगाबाद 6, हिंगोली 1, जालना 1), लातूर – 3 (लातूर 2, नांदेड 1) असे मृत्यू झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”

महत्वाच्या बातम्या-

गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More