पुणे महाराष्ट्र

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 750 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 28078 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 1029 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

513 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 728 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29107 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 9409 एवढी आहे. तर आतापर्यंत 874 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘राजस्थानमध्ये भाजप सरकार येईल अन् महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार जाईल’; केंद्रीय मंत्र्याचा खळबळजनक दावा

राज्यात आज 6741 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

‘हे’ कारण देत कोरोना टेस्ट करण्यास रेखाने दिला नकार!

‘नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा’; देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना पत्र

आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही १६ जुलैपासून लॉकडाऊन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या