Top News महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात ७७८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

Loading...

मुंबई | आज राज्यात कोरोनाबाधित ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६,  पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २  रुग्ण आहेत तर ९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ( ५८ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

Loading...

मुंबई महानगरपालिका: ४२०५ (१६७)

ठाणे: ३४ (२)

ठाणे मनपा: २१४ (४)

नवी मुंबई मनपा: ९७ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: १२४ (३)

उल्हासनगर मनपा: २

भिवंडी निजामपूर मनपा: ८

मीरा भाईंदर मनपा: ११६ (२)

पालघर: २१ (१)

वसई विरार मनपा: १०९ (३)

रायगड: १४

पनवेल मनपा: ३६ (१)

ठाणे मंडळ एकूण: ४९८० (१८७)

नाशिक: ४

नाशिक मनपा: ७

मालेगाव मनपा:  १०९ (९)

अहमदनगर: २४ (२)

अहमदनगर मनपा: ८

धुळे: ४ (१)

धुळे मनपा: १३ (१)

जळगाव: ६ (१)

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: ७ (१)

नाशिक मंडळ एकूण: १८४ (१६)

पुणे: ४१ (१)

पुणे मनपा: ८१२ (५९)

पिंपरी चिंचवड मनपा: ५७ (२)

सोलापूर: १

सोलापूर मनपा: ३२ (३)

सातारा: २० (२)

पुणे मंडळ एकूण: ९६३ (६७)

कोल्हापूर: ६

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २५

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ७ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (२)

औरंगाबाद:०

औरंगाबाद मनपा: ४० (५)

जालना: ३

हिंगोली: ७

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ५१(५)

लातूर: ८

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: १

लातूर मंडळ एकूण: १३

अकोला: ११ (१)

अकोला मनपा: ९

अमरावती: ०

अमरावती मनपा: ७ (१)

यवतमाळ: १७

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ६९ (३)

नागपूर: २

नागपूर मनपा: ९८ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)

इतर राज्ये: २१ (२)

एकूण: ६४२७  (२८३)

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात  संसर्गग्रस्त  झालेले आहेत. *मुंबई मनपाच्या आजच्या आकडेवारीत प्रयोगशाळेकडील १३ एप्रिल पासूनच्या प्राप्त अहवालांचा समावेश करण्यात आलेला आहे.)

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

गुजरातमधील कोरोनासंदर्भात हार्दिक पटेल यांचा धक्कादायक आरोप

जामखेडमध्ये 11 रुग्ण ऐकून माझं मन सुन्न झालं, रात्रभर झोप आली नाही- राम शिंदे

प्रामाणिक पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अस्वस्थ झाले- आशा भोसले

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या