बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज सोनं तब्बल 460 रुपयांनी घसरलं, तर चांदी देखील उतरली; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव 49 हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले होते. मात्र, आता महिन्याच्या अखेर सोनं मोठ्या प्रमाणात खाली उतरलं आहे.

एमसीएक्सवर आज सोन्याचा दर 46 हजार 740 रुपये प्रती तोळा आहे. काल हाच दर 47 हजार 200 रुपये प्रती तोळा होता. म्हणजेच आज सोन्याच्या दरात कालच्या दरापेक्षा 460 रुपयांची घट झाली आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरात देखील मोठी घट झाली आहे.

काल एमसीएक्सवर चांदीचा दर 68 हजार रुपये प्रती किलो होता. चांदीचा दर आज तब्बल 400 रुपयांनी घसरला आहे. आज एमसीएक्सवर चांदीचा दर 67 हजार रुपये प्रती किलो आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More